Maharashtra Politics : राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका आहे. वर्षा बंगला सोडताना जेव्हा एखादी नवरी घर सोडते तसं यांनी सोंग केलं असल्याचे टीकास्त्र भुमरे यांनी सोडले. शिंदे गटाच्या 'हिंदू गर्व गर्जना यात्रा' निमित्त अमरावतीत झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकरदेखील (Arjun Khotkar) उपस्थित होते.

शिंदे गटाच्या 'हिंदू गर्व गर्जना यात्रा' निमित्त अमरावती जिल्ह्यामध्ये संघटनात्मक मार्गदर्शन भुमरे आणि खोतकर यांनी केले. अमरावती शहरातील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिराच्या हॉलमध्ये हा मेळावा पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिंदे गटातील शिवसेनेचे कार्यकर्ते हजर होते. यावेळी संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

भुमरे यांनी उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांवर टीका करताना म्हटले, मातोश्रीवर गोचीड जमा झाले आहेत. कोणत्याच फाइलवर सही न करण्यास हे गोचीड सांगत होते. सही केली तर अडचणीत याल, असेही सांगत होते. त्यांच्यामुळे कोणाचेच काम झाले नाही असा आरोपही भुमेर यांनी केला.

नवरीप्रमाणे वर्षा बंगला सोडला...

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे आणि इतर काही आमदारांनी सूरत गाठले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत देताना वर्षा बंगला सोडत असल्याचे सांगितले होते. शिंदे गटाने चर्चेसाठी मुंबईत यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा बंगला सोडला. उद्धव यांनी वर्षा बंगला सोडण्याच्या निर्णयावरही भुमरे यांनी जोरदार टीका केली. वर्षा बंगला सोडला तेव्हा एखादी नवरी कशी घर सोडते, तसे सोंग केले असल्याची बोचरी टीका भुमरे यांनी केली.

मास्क गेला, खुर्चीही गेली...

संदिपान भुमरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोरोना काळातील मास्क वापराबाबतही टीका केली. आम्ही उद्धव यांना भेटण्यासाठी जायचो तेव्हा मास्क वापरायचे. आता, सरकार गेले तेव्हा मास्कही गेला, कोरोनाही गेा आणि कोरोनाही गेला असल्याची टीका भुमरे यांनी केली. वांद्रे-कुर्ला संकुलावर आपला दसरा मेळावा होणार असून कोणाचा मेळावा मोठा होतो ते आता पाहूनच घेऊ असे म्हणत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले.

source https://marathi.abplive.com/news/amravati/maharashtra-politics-maharashtra-minister-sandipan-bhumare-criticize-shivsena-chief-uddhav-thackeray-1103685
0 Comments