Deepak Kesarkar on Aaditya Thackeray : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी आज अंबाबाई मंदिरात भेट देत देवीचे दर्शन घेतले. अंबाबाईची सेवा माझ्याकडून व्हावी, अशी देवीची इच्छा असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर दिली.

भाजप आणि सेनेला जोडणारा मी दुवा असून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती कायम राहवी यासाठी माझा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

कोल्हापूरमध्ये कोल्हापुरात असतानाच पालकमंत्री झाल्याचं समजले. बुधवारपासून कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवाजी महाराज, शाहू महाराज ताराराणीच्या पराक्रमाचे प्रतिक कोल्हापूर असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूरच्या हेरिटेज इमारती तालमी यांकडे विशेष लक्ष असेल, तालमींना कशी मदत करता येईल याचा प्लॅन तयार करायला सांगितला आहे. सातारा, कोल्हापूर गादीच महत्व जपलं पाहिजे असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंवर केसरकरांचा हल्लाबोल

बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन आव्हान देत असलेल्या युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर दीपक केसरकर यांनी चांगलाच हल्ला चढवला. ज्यांनी खुरा खुपसला त्यांच्या सभांना गर्दी होत असेल तर, वस्तुस्थिती समोर यायला हवी असे केसरकर म्हणाले.

मंत्रालयात कितीवेळा गेले ते जाहीर करावे

केसरकर यांनी आदित्य ठाकरे मंत्रालयात आपल्या कार्यालयात किती वेळा गेले हे जाहीर करावे, असे आव्हान दिले. जे कार्यालयात जाऊ शकले नाहीत ते इन्वेस्टमेंट काय आणणार? असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला. प्रकल्प कसे आणायचे आम्हाला चांगलं माहीत आहे. आदित्य ठाकरे खोटं बोलून महाराष्ट्रभर फिरत असतील, तर ही ग्लोबेल्स नीती असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. शंभर वेळा खोटं बोलण्याचं पाप आज महाराष्ट्रात घडत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राची जनता दाखवून देईल खरं कोण आणि खोटं कोण, असेही ते म्हणाले.

तुम्हाला पर्यटन आणि उद्योगावर बोलायचं काय अधिकार? तुम्ही खोटं सांगत असाल, तर आम्हालाही खरं सांगत महाराष्ट्रभर करावे लागेल, असे केसरकर म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/MUcDnYF : NIA ने कोल्हापुरातून उचललेल्या 'PFI'च्या मौला मुल्लाला 12 दिवसांची पोलिस कोठडी, गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांची करडी नजर

<a href="https://ift.tt/NJnjQ5Z Sakhar Karkhana : राजाराम कारखान्याचे 1346 सभासद अपात्र झाल्याने महाडिक गटाला तगडा झटका, सतेज पाटील गटाची सरशी

source https://marathi.abplive.com/news/kolhapur/deepak-kesarkar-sharp-attack-on-aaditya-thackeray-over-his-maharashtra-tour-1103684
0 Comments