Nandurbar Election : नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा; 10 ग्रामपंचायती बिनविरोध

Nandurbar Gram Panchayat Election : नंदुरबार जिल्ह्यात (Nandurbar News) 149 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल होऊन उमेदवारी यांची छाननी झाली आहे. यात शहादा तालुक्यातील (Shahada) सहा ग्रामपंचायती तर नंदुरबार तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीसाठी एक एक अर्ज आल्याने त्या ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत.  नंदुरबार तालुक्यात 75 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी 315 तर सदस्यांसाठी 1447 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीमध्ये सरपंचपदाचे 12 तर सदस्य पदाचे 25 अर्ज बाद ठरले आहेत. तर शहादा तालुक्यात सरपंचपदाचे 4 तर सदस्यपदाचे 25 अर्ज बाद ठरले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र माघारी नंतर स्पष्ट होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस

जिल्ह्यात 149 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने चुरस अधिक वाढली आहे. नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अधिक चुरस पाहण्यास मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात डॉ विजयकुमार गावित यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका अधिक चुरशीच्या झाल्या आहेत. या निवडणुका सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत.

नंदुरबार तालुक्यात शिंदे गट आणि भाजप आमने-सामने

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आणि शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटात नंदुरबार तालुक्यात ग्रामपंचायती निवडणुका अत्यंत चुरशीच्या होत आहेत. दोन्ही गटांनी आपली प्रतिष्ठा प्रणाला लावली आहे तर शहादा तालुक्यात काँग्रेस आणि भाजप यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

माघारीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार

माघारीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असलं तरी विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या सर्वात मोठ्या निवडणुका असल्याने जिल्ह्यातील राजकीय स्थितीचे स्पष्टीकरण करणाऱ्या या निवडणुका ठरतील. जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ नेते या निवडणुकींकडे लक्ष ठेवून असून आपल्या गटाला जास्त जास्त ग्रामपंचायती कशा मिळतील यासाठी प्रयत्न करीत आहेत.

नंदुरबार तालुक्यातील बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती

देवपूर ,वरुळ ,सुतारे, भवानी पाडा

शहादा तालुक्यातील बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती

पुरुषोत्तम नगर, मोहिदा तर्फे हवेली,  सावखेड्या, मानमोड्या, काक्रदे,कलसाडी

इतर महत्वाच्या बातम्या

<a class="topic_text" title="Traffic Police : वाहन चालकांवर कारवाई करताना खासगी मोबाईल वापरल्यास पोलिसांवर होणार कारवाई" href="https://ift.tt/tThwgOE Police : वाहन चालकांवर कारवाई करताना खासगी मोबाईल वापरल्यास पोलिसांवर होणार कारवाई

<a class="topic_text" title="Beed Soyabean Special Report : पावसाअभावी बीडमध्ये शेतकरी हैराण, आता नजरा आभाळाकडं" href="https://ift.tt/8vL51pU Soyabean Special Report : पावसाअभावी बीडमध्ये शेतकरी हैराण, आता नजरा आभाळाकडं

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/nandurbar-election-for-149-gram-panchayat-nivadnuk-latest-news-updates-1096726

Post a Comment

0 Comments