<p><strong>Jayant Patil :</strong> राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना चिमटा काढलाय. मंत्रीपद मिळाले नाही, तर आमदार बाहेर पडतील या भीतीपोटीच मंत्रीमंडळ विस्तार थांबला असल्याचे जयंत पाटील म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी लवकरच विस्तार करु असं म्हटलं तर ती घोषणा खरी मानली जाते असेही पाटील म्हणाले.</p> <p>मंत्रीपद मिळाले नाही, तर आमदार बाहेर पडतील या भीतीपोटीच मंत्री मंडळ विस्तार थांबला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. विस्तार केला आणि नाराज आमदार बाहेर पडले तर संख्याबळ कमी होईल आणि शिंदे गट अडचणीत येऊ शकतो, म्हणून मंत्रीमंडळ विस्तार थांबला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितलं. मंत्रीमंडळ विस्तार होणार हे जाहीर करायचा अधिकार फडणवीसांना नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. मात्र, फडणवीसांनी आपले मत मांडलं असावं असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.</p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/nationalist-congress-president-jayant-patil-criticizes-devendra-fadnavis-for-cabinet-expansion-1115248
0 Comments