<p>पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे... राज्यात14 हजार 956 पोलीस शिपायांची भरती होणार आहे... या संदर्भात राज्य सरकारकडून आदेश जारी करण्यात आलाय.. राज्यात पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागा लक्षात घेता, पोलीस भरतीच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात. महाराष्ट्र पोलीस दलातील विविध जिल्ह्यातील तब्बल 14 हजार 956 जागासाठी ही भरती असणार आहे. माहितीनुसार, दोन टप्प्यात या जागा भरल्या जाणार आहेत.. एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सूचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. </p> <p> </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-government-to-recruit-police-constables-for-14-thousand-956-vacancies-1114954
0 Comments