Pune PMPML News :  पुण्यातील ग्रामीण भागातल्या 11 मार्गावर PMPML ची सेवा बंद होणार, वाचा ते 11 मार्ग कोणते?

Pune PMPML News : पुणे (Pune) जिल्ह्यातील ग्रामीण भागाील प्रवाशांसाठी (Travelers in rural areas) एक महत्त्वाची बातमी आहे. 26 नोव्हेंबरपासून म्हणजेच उद्यापासून पुण्यातील ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएलची (PMPML) वाहतूक सेवा बंद होणार आहे. ग्रामीण भागात सुरु केलेल्या मार्गावर कमी उत्पन्न होत असल्यानं PMPML कडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

दरम्यान, ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएलची सेवा होणार बंद होणार असल्यानं दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता या निर्णयावर आता ग्रामीण भागातील प्रवासी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

'या' 11 मार्गावरील PMPML बससेवा बंद होणार

1) स्वारगेट ते काशिंगगाव
2) स्वारगेट ते बेलावडे
3) कापूरहोळ ते सासवड
4) कात्रज ते विंझर
5) सासवड ते उरुळी कांचन
6) हडपसर ते मोरगाव
7) हडपसर ते जेजुरी
8) मार्केटयार्ड ते खारावडे
9) वाघोली ते राहूगाव, पारगाव
10) चाकण ते शिक्रापूर फाटा
11) सासवड ते यवत

या मार्गावरील बससेवा बंद होणार आहे. त्यामुळं ग्रामी भागातील प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/mgrAtqf PMPML : दमदाटी संपेनाच! पीएमपीएमएल चालकाची अन् तरुणाची तुंबळ हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pune-pmpml-bus-services-of-on-11-routes-in-pune-rural-areas-will-be-closed-1124177

Post a Comment

0 Comments