<p>अमरावतीच्या दर्यापूर बाजारात दोन युवक हातास पिस्तुल घेऊन फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. दर्यापूरच्या आठवडी बाजारात मध्यरात्री हे तरूण हातात पिस्तुल घेऊन फिरत होते. मध्यरात्री बाजारात शुकशुकाट असताना हे तरूण तोंडाला कापड बांधून पिस्तुलासह फिरत होते. या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांनी या तरुणांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केलीय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/amravati-amravati-youth-walking-on-streets-carrying-a-revolver-maharashtra-news-1130626
0 Comments