Headlines: शंभुराज देसाई यांचा सीमाभागातील गावचा दौरा, सोलापूर बंदची हाक आणि मुंबई आयआयटीत टेक फेस्टची धूम; आज दिवसभरात

मुंबई: आशियातील सर्वात मोठा टेक फेस्ट म्हणून ओळख असलेला आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा जागतिक पातळीवर विज्ञान तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीचं खऱ्या अर्थाने दर्शन या टेक फेस्टच्या निमित्ताने करता येणार आहे. तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आज 100 दिवस पूर्ण होणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे,

शंभुराज देसाई यांचा सीमाभागातील शिनोळी गावाचा दौरा

राज्याचे मंत्री शंभुराज देसाई सीमाभागातील शिनोळी गावाचा दौरा करणार आहेत. सीमाभाग समन्वयक समितीचे सदस्य आणि मंत्री शंभुराजे देसाई आज कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात जाणार आहेत. कोल्हापुरातून गडहिंग्लज आणि त्यानंतर शिनोळी असा शंभूराज देसाई यांचा प्रवास असेल. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या शिनोळी गावात शंभूराज देसाई यांची ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने सभा होणार आहे. शिनोळी हे गाव महाराष्ट्रात अगदी कर्नाटक सीमेजवळ आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रश्न ताजा असताना समन्वय समितीचे सदस्य असल्याने देसाई यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक दिवसाच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. संध्याकाळी 5 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. आपल्या या दौऱ्यात मुख्यमंत्री काही विभागांचा आढावा, गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पाली येथून मुख्यमंत्री कोल्हापूरकडे रवाना होतील. कोल्हापूरहून रात्री ते विमानाने मुंबईकडे जातील.

आज सोलापूर बंदची हाक

छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महामानवांच्या बाबतीत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आज सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने या बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षासह विविध संघटनाचा पाठिंबा आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या बंदला शिंदे गट, भाजप मनसे या पक्षांचा विरोध आहे.

कोरोनाच्या दोन वर्षानंतर मुंबई आयआयटीत आजपासून टेक फेस्टची धूम

आशियातील सर्वात मोठा टेक फेस्ट म्हणून ओळख असलेला आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टला आजपासून सुरुवात होत आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा जागतिक पातळीवर विज्ञान तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीचं खऱ्या अर्थाने दर्शन या टेक फेस्टच्या निमित्ताने करता येणार आहे. टेक कनेक्ट, ऑटो एक्झिबिशन, इंटरनेशनल एक्झिबिशन, रोबोटिक्स ड्रोन रेसिंग लीग, इंटरनॅशनल रोबोवार हे सगळं या टेक फेस्टमध्ये अनुभवता येणार आहे. विविध राज्यातून, देशातून विद्यार्थी प्रतिनिधी या टेक फेस्टमध्ये सहभागी होणार आहेत.

भारत जोडो यात्रेला आज 100 दिवस पूर्ण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आज 100 दिवस पूर्ण होत आहेत. आज यानिमित्त राहुल गांधींची पत्रकार परिषद होणार आहे. तसेच यावेळी भारत जोडोचं नवीन थीम सॉंग लॉँच करण्यात येणार आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/16th-december-headlines-shambhuraj-desai-visit-kolhapur-border-village-iit-mumbai-tech-fest-headlines-today-1130915

Post a Comment

0 Comments