<p>मुंबई महापालिकेच्या एका कंत्राटात फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रसाद लाड व इतर आरोपींविरोधात २०१४ मध्ये दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात यावा, अशी मागणी करणारा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने अतिरिक्त महानगरदंडाधिकारी न्यायालयात सादर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून दिलासा मिळालेले लाड हे किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतरचे तिसरे भाजप नेते आहेत. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-after-somaiya-darekar-economic-offenses-branch-closes-investigation-1131257
0 Comments