2 January Headlines : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्यावर, निवासी डॉक्टरांचा संप; आज दिवसभरात

2 January Headlines : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा चंद्रपूर आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शिवाय आजपासून राज्यभरातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात होत असून धुळे जिल्ह्यात 3 हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. 5 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मैदानी चाचणीला आज सुरुवात होणार असून कडकाच्या थंडीत उमेदवारांची गर्दी होणार आहे.  राज्यातील हिंगोली, परभणी,  यवतमाळ, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात ही भरती होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा चंद्रपूर आणि औरंगाबादच्या दौऱ्यावर

भाजपच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 (144) ची घोषणा केली आहे. यात १८ लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हिट लिस्टवर आहेत. यापैकी दोन मतदारसंघात म्हणजे चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज दौरा करणार आहेत.  औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर भाजपाची  सभा होणार आहे. यावेळी जे.पी नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, भागवत कराड यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपाची ही औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीची सभा आहे.

आजपासून राज्यभरातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार

विविध मागण्यांसाठी मार्डने संपाचा इशारा दिलाय. अतिदक्षता विभाग वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचा संघटनेने इशारा दिला असून राज्यभरातील 7 हजारांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत.  शनिवार पर्यंत वेळ देउन देखील चर्चेचं निमंत्रण न मिळाल्याने आजपासून संघटना संपावर ठाम आहेत. राज्यातील सर्व शासकीय आणि महाविद्यालयात निवासी डॉक्टरांकडून निदर्शने केली जाणार आहेत. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील 172 डॉक्टर आजपासून काम बंद आंदोलन करणार आहेत. सोलापुरातील मार्ड संघटनेशी संबंधित संघटनाही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील दीडशे डॉक्टरांचाही संपात समावेश आहे.

आजपासून पोलिस भरतीसाठी मैदान चाचणी
पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात होत असून धुळे जिल्ह्यात 3 हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. 5 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मैदानी चाचणीला आज सुरुवात होणार असून कडकाच्या थंडीत उमेदवारांची गर्दी होणार आहे.  राज्यातील हिंगोली, परभणी,  यवतमाळ, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यात ही भरती होणार आहे.

मुंबई  शीझान खानचे वकील आणि बहिणीची पत्रकार परिषद
अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य संयित शीझान खानचे वकील आणि बहिणी पत्रकार परिषद घेणार आहेत.

पुण्यात नीलम गोऱ्हेंची पत्रकार परिषद

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद होणार आहे.

धुळ्यात सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन

जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयात हे आंदोलन होणार आहे.

वर्धा येथे लाक्षणिक उपोषण

वर्ध्यानजीक असलेल्या आलोडी ग्रामस्थांचे स्मशानभूमीसाठी लाक्षणिक उपोषण, निस्तार हक्क डावलून प्रशासनाने शासकीय रेकॉर्डवरून स्मशानभूमी हटविल्याची माहिती. त्यामुळे लाक्षणिक उपोषण होतंय.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/2-january-headlines-bjp-national-president-jp-nadda-on-tour-of-chandrapur-and-aurangabad-resident-doctors-on-strike-marathi-news-1136557

Post a Comment

0 Comments