Anganwadi Workers Strike : राज्यातील अंगणवाडी सेविका पुन्हा संपावर, काय आहेत मागण्या?  Nandurbar

<p>राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय... राज्यातील 16 जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या तीन दिवसांपासून संपावर आहेत... तर काही जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आजपासून संपात सहभागी होणार आहेत. किमान समान कार्यक्रमाअंतर्गत भरीव स्वरुपाची मानधनवाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, 28 फेब्रुवारीला राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-anganwadi-workers-call-for-a-strike-with-several-demands-nandurbar-news-1154153

Post a Comment

0 Comments