<p>पनवेलमधल्या एका विद्यार्थ्यानं बारावीच्या अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानं घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पनवेलमधल्या देवदर्शन सोसायटीत घडली. वंश म्हात्रे असं या १७ वर्षांच्या विद्यार्थ्याचं नाव आहे. गेल्या काही दिवसापासून तो बारावीच्या अभ्यासामुळं तणावाखाली होता. काल रात्री आईवडील घरात नसल्याचं पाहून वंश म्हात्रेनं आत्महत्येचं पाऊल उचललं.</p> <p> </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-panvel-student-kills-himself-after-he-was-tensed-with-his-hsc-exams-maharashtra-news-1153827
0 Comments