वातावरण बदलामुळे गेल्या काही दिवसात शहरात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत असल्याने रुग्णालयात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच H3H2 या नवीन व्हायरसचे रुग्ण देखील वाढत असल्याचे पाहायला मिळाले. मात्र H3H2 व्हायरस व कोरोना संसर्गाची लक्षणे सारखीच असल्याने प्रशासनाने कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाकडून कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहे. तर चाचण्या वाढवताच कोरोना रुग्ण वाढताना पाहायला मिळत आहे. तर गेल्या आठवडाभरात कोरोनाच्या 56 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू देखील झाला आहे.
आरोग्य विभाग देखील अलर्ट
आठ दिवसांपूर्वी म्हणजेच गेल्या शनिवारी एकाच दिवसात तब्बल 17 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून सतत रुग्णसंख्येत वाढ होत आहे. गेल्या आठ दिवसात 56 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 20 रुग्ण बरे झाले असून, अजूनही 36 रूग्ण सक्रिय आहेत. सध्याचा पॉझिव्हिटी रेट तब्बल 13.82 टक्के एवढा नोंदवला गेला आहे. वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य विभाग देखील अलर्ट झाले आहेत. संशयीत रुग्णांची चाचण्या वाढवण्यात येत आहे. तसेच अनेक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच अशीच रुग्ण संख्या वाढत राहिल्यास त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत देखील आरोग्य विभागाकडून आढावा घेतला जात आहे.
मेल्ट्रॉन रुग्णालयातील सुविधा सज्ज
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे शहरातील परिस्थिती प्रचंड वाईट होती. कोरोना बाधित रुग्णांना लवकर बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे मागील अनुभव पाहता पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होऊ नयेत म्हणून, प्रशासन अलर्ट झाले आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मेल्ट्रॉन रुग्णालयातील सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. तसेच रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याची गरज आहे, अशा रुग्णांना मेल्ट्रॉनमध्ये हलवले जाणार आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन...
शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असल्याने चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर वापर करावा, घरी गेल्यानंतर हात साबणाने धुवावेत, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/MT54DRz चिंता वाढली! छ. संभाजीनगरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
source https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar/maharashtra-news-chhatrapati-sambhaji-nagar-corona-update-56-patients-of-corona-have-been-reported-in-a-week-in-chhatrapati-sambhaji-nagar-1162813
0 Comments