<p>राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर दिलं जाणार आहे. यावेळी ठाकरे सरकारच्या काळातही झालेल्या घटनांचा संदर्भ दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज सभागृहात गोंधळ होण्याची शक्यता आहे. तसंच विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत.. तर अधिवेशनामध्ये विरोधकांच्या चर्चेविना लोकायुक्त बिल विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर आज विधान परिषदेमध्ये लोकायुक्त सुधारित बिल मांडण्यात येणार आहे <strong>आज विधान परिषदेत बिल मंजूर होणार की विरोधक संयुक्त समितीकडे बिल पाठवण्यासाठी मागणी करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. </strong></p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-budget-session-last-day-maharashtra-politics-news-1162606
0 Comments