<p>माजी मंत्री हसन मुश्रूफ यांचे निकटवर्तीय चंद्रकांत गायकवाड यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. गायकवाड यांना उद्या ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणात ईडीला गायकवाड यांची चौकशी करणार आहे. सोमवारी गायकवाड यांच्या पुण्यातील घर आणि कार्यालयात अनेक तास ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू होतं. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-ed-issued-notice-to-hasan-mushrif-close-associate-chandrakant-gaikwad-1165132
0 Comments