<p>देशाला नवं संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात देशाच्या नव्या संसद भवनाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. साधूसंतांच्या मंत्रोच्चारात हा कार्यक्रम सोहळा पार पडला. नव्या संसदेचं लोकार्पण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राजदंडाची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सर्व धर्मीयांची प्रार्थना पार पडली. यावेळी पंतप्रधांनांनी सर्व सांधूसंत आणि धार्मिक गुरुंना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/politics-new-parliament-homhavan-and-ritual-puja-outside-parliament-house-1179521
0 Comments