<p>संत तुकोबारायांच्या पालखीचा आज महत्त्वाचा दिवस आहे. पुणे जिल्ह्यातील सराटीमध्ये तुकोबारायांच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात येतंय. पालखी सोहळ्यानं सराटीमधून पहाटे प्रस्थान ठेवलं. निरा स्नानानंतर तुकोबारायांची पालखी पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. त्यानंतर सकाळी ९च्या सुमाराला अकलूजमध्ये तुकोबारायांच्या पालखीचा तिसरा रिंगण सोहळा होईल. अकलूजमधील माने विद्यालयाच्या प्रांगणावर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तिसऱ्या रिंगणासाठी भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झालीय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-aashadi-wari-2023-important-day-of-tukobaraya-palkhi-ceremony-1186774
0 Comments