Maharashtra NCP Crisis: महरषटरल नव मखयमतर मळणर जयत पटलच दव कतपत खर? अजत पवरचय बडमळ 2024 परव भजपसठ 'गड नयज'

Maharashtra Politics Crisis: राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे रविवारी (2 जुलै) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Maharashtra Deputy CM) झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, या घटनाक्रमामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ताकद कमी होईल. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, अजित पवारांच्या या दाव्याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच, भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याच्या अजि पवारांचा दावा खोटा असून त्यांना पक्षाचा कोणताही पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केलं.

महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळणार, जयंत पाटीलांच्या दाव्याला किती महत्त्व?

ताज्या घडामोडींवर भाष्य करताना जयंत पाटील यांनी दावा केला की, "आता त्यांचे (एकनाथ शिंदे) महत्त्व कमी करण्यासाठी अजित पवारांना आधीच बहुमत असलेल्या सरकारमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे." जयंत पाटलांच्या या  दाव्याकडे महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळण्याच्या शक्यतेच्या रुपात पाहिलं जात आहे.

राज्यातील प्रादेशिक पक्षांमधील बंड 2024 पूर्वी भाजपासाठी 'गूड न्यूज'

लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी राष्ट्रवादीमधील अजित पवारांचं बंड भाजपसाठी गूड न्यूज आहे. अजित पवारांच्या या बंडामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी सकारात्मक असणाऱ्या शरद पवारांना जोरदार धक्का बसला आहे. 23 जून रोजी पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपविरोधात रणनिती आखण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी झाले होते.

29 जून रोजी शरद पवार यांनी यासंदर्भात बोलताना म्हटलं होतं की, विरोधी पक्षांची पुढची बैठक आता 13-14 जुलै रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे. तसेच, विरोधी पक्षांच्या बैठकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले असून त्यामुळेच ते वैयक्तिकरित्या टिका करत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं. पण त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अजित पवारांनी बंड केलं आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली. अजित पवारांना आपल्या बाजूनं वळवत भाजपनं लोकसभा निडणुकीला एक वर्षाहूनही कमी कालावधी शिल्लक असताना विरोधी पक्षांच्या एकजुटीला सडेतोड उत्तर दिलं आहे.

अजित पवारांच्या रुपात भाजपनं तयार केलाय शिंदेंना पर्याय?

अजितदादांच्या सोबत येण्यानं एनडीए (NDA) तर मजबूत होईलच, शिवाय भाजपला भागीदार म्हणून शिंदे यांना पर्याय उपलब्ध होईल. अशा परिस्थितीत भाजप आता शिंदेंचा पत्ता कट करु शकते, असं बोललं जात आहे.

महाविकास आघाडीला झटका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांकडे तब्बल 40 आमदारांचं समर्थन आहे, असा ते दावा करत आहेत. राष्ट्रवादीच्या काही खासदारांचंही त्यांना समर्थन असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या विरोधात उभी असलेल्या महाविकास आघाडीतही फूट पडण्याची शक्यता आहे. असं म्हटलं जात आहे की, लोकसभा निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. अशातच अजित पवारांच्या रुपानं भाजपनं खेळलेला नवा डाव त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान, अशी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवलेली नसून पुन्हा राष्ट्रवादीला बळ देणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात आणखी काय-काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/6seKX4b Patil On Ajit Pawar Disqualification : शपथविधी बेकायदेशीर, अजित पवारांसह नऊ जणांवर अपात्रतेची कारवाई होणार; जयंत पाटलांची मोठी घोषणा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-ncp-political-crisis-will-there-be-new-cm-as-ajit-pawar-joins-maharashtra-govt-know-jayant-patil-remarks-know-details-1189319

Post a Comment

0 Comments