<p><br />महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांना कांदा अनुदान प्रश्न विचारण्यासाठी 'फोन आंदोलन' सुरू करण्यात आलं. या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक शेतकरी मंत्री आणि आमदारांना फोन करत आहेत. प्रत्येक मतदारसंघातील आमदार आणि मंत्री यांना कांदा अनुदानबाबत फोन करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांनी केलंय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-onion-farmer-when-will-onion-farmers-get-subsidy-farmers-are-angry-1193729
0 Comments