<p>Maharashtra Rain: राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज राज्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावलीये. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर कोकणात पुढील 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट माथ्यावरही अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर मराठवाडा, विदर्भातदेखील पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली आणि चंद्रपुरात पुढील 48 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-rain-update-five-days-rain-in-maharashtra-marathi-news-abp-majha-1193705
0 Comments