Buldhana : समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, ट्रक जळून खाक

Buldhana Fire : समृद्धी महामार्गावर (samruddhi mahamarg) केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग (Truck Fire) लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. यामुळं समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. ही घटना बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकरजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

नाशिकहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅकचा टायर फुटून भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. मेहकर जवळ ही घटना घडली. या ट्रकमध्ये केमिकल असल्यानं आगीनं लगेच रौद्र रुप धारण केलं होतं. ट्रकमधील संपूर्ण केमिकल जळून खाक झालं आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळं समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक काही काळ थांबवावी लागली. ही आग इतकी मोठी होती की जवळपासच्या गावातील नागरिक महामार्गावर धावत आले.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/6LavOnt Truck : ट्रकमधून ड्रायव्हरने वेळीच उडी मारली म्हणून.... धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

source https://marathi.abplive.com/news/buldhana/samruddhi-mahamarg-news-a-truck-carrying-chemicals-caught-fire-in-buldhana-1198187

Post a Comment

0 Comments