CM Eknath Shinde : पुढच्या अडीच वर्षात मुंबई (Mumbai) खड्डेमुक्त होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. आपलं काम वर्षभर सुरु असते. मला बोलायला येतं पण मी जास्त बोलत नाही. कमी बोलतो जास्त काम करतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते, उपनेते, सचिव यांची वर्षा या निवासस्थांनी तातडची बैठक बोलवली होती. त्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे विक्रोळी कन्नमवारनगरचे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

माजी नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्यासह शिरुर, आळंदी आणि त्या मतदारसंघातील काही जणांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच आळंदी धाम सेवा समितीमधून मोठ्या संख्येनं वारकऱ्यांनी देखील शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. आज हजारो कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. बाळासाहेबांचा 80 टक्के समजकारण आणि 20 टक्के राजकारण हा विचार घेऊन आम्ही काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कामे कशी होणार, नेते कामच करत नव्हते

उपेंद्र सावंत म्हणाले मागील काही वर्षात कामे झाली नाहीत. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. कामे कशी होणार तुमचे नेतेच काम करत नव्हते असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मला बोलायला येत पण मी कमी बोलतो आणि जास्त काम करतो असे मुख्यमंत्री म्हणाले. निवडणुकांना आम्ही घाबरतो अशी टीका विरोधक करतात. पण निवडणुकांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात तुम्हीच गेला आहात ना असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील

सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक बोलत आहेत की, सरकार पडणार. पण आता काय झालं असं सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला. दरम्यान, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत पंत्परधान नरेंद्र मोदी सगळे रेकॉर्ड मोडतील. मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, यावेळी सोलापूरमधील मोहळचे ठाकरे गटाचे नेते दादा पवार यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या:

दोन वेळा मुहूर्त हुकल्यावर अखेर मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांचा जालना दौरा ठरला; 8 सप्टेंबरला शासन आपल्या दारी कार्यक्रमात लावणार हजेरी

source https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-will-be-pothole-free-in-next-two-and-a-half-years-chief-minister-expressed-confidence-1205259
0 Comments