<p>राज्यात साथीच्या आजारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं... डोळं येणं, इन्फ्ल्यूएन्झा, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही डोळे येणाऱ्या रुग्णांची असून ४ लाखाच्या घरात आहे. राज्यात १३ ऑगस्टपर्यंत ४ लाखांच्या जवळपास डोळ्यांचा संसर्ग झाल्याची आकडेवारी आरोग्य विभागानं जाहीर केली. तर यापाठोपाठ डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे रुग्ण आहेत. याशिवाय लेप्टो, इन्फ्ल्यूएन्झाचे रुग्णसंख्याही वाढली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबईमधली असून राज्यात इतर भागातही साथीच्या रोगांचा संसर्ग बळावला आहे, त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-has-4-lakh-people-with-poor-eyesight-1201844
0 Comments