Nashik News : जुन्या भांडणाची कुरापत काढून नाशिकमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोरांचा शोध सुरू
नाशिकच्या म्हसरूळच्या चाणक्यपुरीतील ही घटना आहे. या घटनेच्या संदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेतील संशयित हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
शासकीय रूग्णालयात तरूणावर उपचार सुरु
हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणावर उपचार करण्यासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
हल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण
नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने संबंधित परिसरात मात्र तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीच्या वेळी घडलेलया या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. नाशिकमध्ये सततची होणारी वाढती गुन्हेगारी रोखण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलं होतं 15 दिवसांचं अल्टीमेटम
शनिवारी पालकमंत्री दादा भुसे यांनी शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेत 15 दिवसांचं पोलिसांना अल्टीमेटम दिलं होतं. परंतु, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने गुन्हेगारांचे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/95ph0ve news : पंधरा दिवसांत नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा, पालकमंत्री दादा भुसे यांचा मनपाला अल्टिमेटम
source https://marathi.abplive.com/news/nasik/maharashtra-nashik-news-youth-brutally-attacked-in-nashik-over-old-quarrel-marathi-news-1199002
Post a Comment
0 Comments