<p>शरद पवार येत्या १७ तारखेपासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात ते बीड जिल्ह्यातून करणार आहेत. त्याआधी आठ दिवस म्हणजे ९ ऑगस्टपासून कर्जत-जमखेडचे आमदार रोहित पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भाजपचा गड असलेल्या नागपूरमधून रोहित पवारांचा दौरा सुरू होण्याची शक्यता आहे. येत्या शनिवारी थोरल्या पवारांच्या नेतृत्वात शरद पवार गटाची बैठक होणार आहे, त्या बैठकीत हे दौरे अधिकृतरित्या जाहीर केले जातील. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-from-17-august-sharad-pawar-will-be-conducting-maharashtra-daura-starting-from-beed-marathi-news-1197908
0 Comments