Zero Hour : पवारांच्या बीडमधील भाषणाचा अर्थ ते महिलांविरोधात वाढते गुन्हे सविस्तर चर्चा

<p>बीडचं आणि शरद पवारांचं तसं जुनं नातं. ते जास्त गहिरं झालं गोपीनाथ मुंडेंच्या काळात. भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडेंचा हा जिल्हा. मुंडे विरुद्ध पवार, बीड विरुद्ध बारामती हा संघर्ष महाराष्ट्राने जवळपास तीन दशकं पाहिला. ज्या वेळी शरद पवार राजकारणात सर्वशक्तिमान होते त्या काळात गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्याशी थेट संघर्ष केला. पक्ष वाढवला. पवारांनी सुद्धी मुंडेंना खिंडीत गाठायची एकही संधी सोडली नाही. आधी पुतण्या धनंजयला आपल्याकडे वळवलं. नंतर २००९ आणि २०१४ या दोन्ही वेळी मुंडे लोकसभेला उभे राहिले तेव्हा राष्ट्रवादीने, पवार काका पुतण्यांनी त्यांना हरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गोपीनाथ मुंडे गेले पण मुंडे-पवार संघर्ष सुरु राहिला. फक्त त्याला मुंडे विरुद्ध मुंडे असं स्वरुप देण्यात पवार यशस्वी ठरले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता पुन्हा एकदा बीडमध्ये मुंडे विरुद्ध पवार संघर्षाचा पुढचा अध्याय लिहिला जातोय.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-zero-hour-abp-majha-sharad-pawar-beed-crimes-against-women-increased-1202115

Post a Comment

0 Comments