<p>एकीकडे मराठा समाजानं राज्य सरकारला आरक्षणासाठी ४० दिवसांची मुदत दिलेली असताना दुसरीकडे आज धनगर समाजानंही सरकारला ५० दिवसांची मुदत दिलीए... तर तिकडे मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी ओबीसी समाजाचं साखळी उपोषण सुरुच आहे... त्यामुळे आता सरकारची आरक्षण मुद्द्यावरुन तिन्ही बाजूनं कोंडी झालीए.... आता मराठा समाजाचं अल्टिमेटम संपण्याआधी सरकारला तोडगा काढावा लागणार आहे... त्यानंतर १० दिवसांनी धनगर आरक्षणावर निर्णय घ्यावा लागेल आणि त्यादरम्यान ओबीसी वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्यानं सरकारला ओबीसींच्याही मागणीचा विचार करावा लागणार आहे... </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-dhangar-samaj-maratha-reservation-update-50-days-alerts-from-dhangar-samaj-and-40-days-alert-to-governments-from-maratha-reservation-abp-majha-1212938
0 Comments