<a href="https://ift.tt/4MvtWIV Jarange On Maratha Reservation : मराठा समाजाचे नेते (Maratha Leader) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाचा (Maratha Protest) दुसरा पार्ट आजपासून सुरू होणार आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी (OBC) तून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारला (Maharashtra Government) दिलेलं 40 दिवसांचं अल्टिमेटम आज संपला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. तसेच, प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तसेच पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/manoj-jarange-hunger-strike-for-maratha-reservation-start-from-today-after-the-ultimatum-is-over-given-shinde-govt-marathi-news-update-1222148
0 Comments