<p>मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर शनिवारी घेण्यात आलेला ३८ तासांचा मेगाब्लॉक आज दुपारी १ वाजता संपणार आहे.... मात्र हार्बर मार्गावर गाड्या सुरळीत होईपर्यंत प्रवाशांचे हाल सुरुच राहण्याची शक्यता आहे... य़ाचं कारण ३८ तासांचा मेगाब्लॉक जरी संपला असला तरी पुढचे पाच दिवस ट्रॅफिक ब्लॉक सुरुच राहणार आहे... त्यामुळे लोकल वाहतुकीत काही बदल करण्यात आलेत.... पाच दिवसांच्या ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात आल्यात.. पनवेल यार्ड रिमॉडेलिंग आणि डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-mumbai-local-megablock-updates-1214473
0 Comments