<a title="Nagpur Crime" href="https://ift.tt/JhECwU7" target="_self">Nagpur Crime : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कामठी (Kamathi) भागात एका माजी नगरसेवकावर आठ ते दहा अज्ञात लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दंडुक्याने हा हल्ला केल्याचे समजते. हल्ला झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव दिलीप बांडेबुचे (Dilip Bandebuche) असून ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आठ ते दहा अज्ञात लोकांचा जीवघेणा हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिलीप बांडेबुचे बुधवारी रात्री त्यांची जिम बंद करून अकरा वाजताच्या सुमारास नेहरूनगर भागातून जात असताना, त्यांच्यावर आठ ते दहा अज्ञात लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. अज्ञात लोकांनी केलेल्या जबर मारहाणीत दिलीप बांडेबुचे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या वेळेस झालेला आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर निघाल्यामुळे दिलीप बांडेबुचे यांचा जीव वाचला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाली आहे.

हेही वाचा >>>

Nagpur Cyber Froud: पालकांनो सावधान! सायबर गुन्हेगारांची नवी युक्ती; मुलाने अत्याचार केल्याचं सांगत सुटकेसाठी उकळले लाखो रुपये

source https://marathi.abplive.com/news/nagpur/maharashtra-nagpur-crime-marathi-news-ex-corporator-attack-beaten-seriously-injured-incident-captured-on-cctv-1258261
0 Comments