TOP HEADLINES:

उसाचा खरेदी दर प्रतिटन ३१५० वरुन ३४०० रुपयांवर, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, १ ऑक्टोबरपासून सुधारित एफआरपी लागू होणार

भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती, वर्षा बंगल्यावर एक तास बैठक

२५ वर्षांत उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी काहीही केलं नाही, मेट्रोसाठी आम्हाला सत्तेत यावं लागलं, उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका

सर्वकाही देऊनही ज्यांनी निष्ठा पाळली नाही त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलीय..दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा, आंबेगाव मतदारसंघातील सभेत शरद पवारांचं मतदारांचा आवाहन,

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची हकालपट्टी, अनेक तक्रारी आल्यानं राज्यपाल रमेश बैस यांची कारवाई

उद्धव ठाकरेंचा आजपासून दोन दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर, लोकसभा मतदारसंघात आज आणि उद्या एकूण सहा सभा

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची कुटुंबीयांची कधीही मागणी नव्हती, नड्डांच्या भेटीनंतर रणजीत सावरकरांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं आज वितरण, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सन्मान, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

लग्न झाले म्हणून महिलेला नोकरीतून काढता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, याचिकाकर्त्या महिलेला 26 वर्षे जुन्या प्रकरणात न्याय

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-21-february-2024-10-pm-maharashtra-news-ranjit-savarkar-jp-nadda-bjp-1258271
0 Comments