Vasai Accident : वसईच्या बाभोला परिसरात भीषण अपघात, मोटरसायकल-कारची समोरासमोर धडक, एक गंभीर जखमी

Vasai Accident : वसई पश्चिमेच्या बाभोला परिसरात रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. मोटरसायकल आणि चार चाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये मोटर सायकलस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

दोघांची समोरासमोर धडक

प्रथम दर्शनी मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत कुटीनो हा जिम मधून आपल्या घरी दुचाकीवर वसईला जात होता.  दरम्यान त्याच ठिकाणाहून समोरून चार चाकी गाडी ही वसई स्टेशनच्या दिशेने येत होती. दोघांची समोरासमोर धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं आहे. कारचे  एअरबॅग उघडल्याने कार मधील वाहनचालकाला काही झालं नाही. मात्र यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्याने येथे अपघात होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

हेही वाचा>>>

Ashok Chavan : काँग्रेसमध्ये ना ताळमेळ आहे ना जिंकण्याची जिद्द, पक्ष सोडताच अशोक चव्हाणांकडून हल्लाबोल सुरु

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-vasai-accident-marathi-news-horrific-accident-in-babhola-area-of-vasai-motorcycle-car-head-on-collision-one-seriously-injured-1256481

Post a Comment

0 Comments