ABP Majha Headlines : 07 AM : 17 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

विधानसभा निवडणुकीत महायुती १८० जागा जिंकणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास, ४०० पारच्या नाऱ्यामुळे कार्यकर्ते गाफिल राहिल्याने लोकसभेला फटका, शिंदेंचीही कबुली

आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवणार, ओबीसी संघटनेच्या विदर्भस्तरीय बैठकीत ठराव मंजूर, प्रकाश शेंडगेंची माहिती

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस, आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ भेटणार, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन द्या, हाकेंची मागणी

छगन भुजबळांच्या पुढाकारानं समता परिषदेची आज मुंबईत बैठक, भुजबळ यांची पक्षातली नाराजी आणि मनोज जरांगेंच्या उपोषणावर चर्चा अपेक्षित

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, महायुतीचे तीनही महत्वाचे नेते दिल्लीला जाणार, राष्ट्रवादीला हवी आहेत एक कॅबिनेट दोन राज्यमंत्रिपदं.

ठाण्यातून महायुतीला तडीपार करू असं म्हणणाऱ्यांनाच जनतेनं तडीपार केलं, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
(('महायुतीला तडीपार करू म्हणणारेच तडीपार'))

ईव्हीएम आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही, ईव्हीएमला ओटीपी लागतच नाही, निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण.

ईव्हीएमशी छेडछाड होण्याचा धोका कायम, त्यांचा वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे, एलन मस्कचं मत, तर भारतीय ईव्हीएम हॅक करणं अशक्य, राजीव चंद्रशेखर यांचं प्रत्युत्तर
((ईव्हीएम हॅक करणं शक्य-एलन मस्क))

नीट परीक्षेत अनियमितता झाल्याचं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं मान्य, दोषींवर कारवाई होणार, बिहारमध्ये आतापर्यंत 13 आरोपींना अटक.

नागपूर-कामठी मार्गावर बसची रिक्षाला धडक, अपघातात दोन जवानांचा मृत्यू, तर सहा जवान आणि ऑटो चालक जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

सातारा जिल्ह्यातलं बलकवडी धरण कोरडंठाक, पुरेसा पाऊस न झाल्यानं धरणातला पाणीसाठी घटला, २४ वर्षांनी २ मंदिरांचे अवशेष दिसू लागले

आज बकरी ईदनिमित्त देशभरात उत्साह. काही ठिकाणी वाहतूकीत बदल तर राज्यातल्या अनेक ठिकाणी सामूहिक नमाज पठण.

गौतम गंभीर बनणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक. लवकरच घोषणा होण्याची शक्यता.जूनच्य़ा अखेरीपर्यंत नावाची घोषणा होण्याची शक्यता.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headlines-07-am-17-june-2024-maharashtra-news-maharashtra-vidhan-sabha-election-2024-mahavikas-aghadi-vs-mahayuti-abp-majha-1291165

Post a Comment

0 Comments