Yavatmal Crime News : यवतमाळ : यवतमाळच्या (Yavatmal News) बाभूळगाव तालुक्यातील (Babhulgaon Taluka) यावली येथे जादुटोणा केल्याच्या संशयावरून एका दाम्पत्याला गावातीलच काही लोकांनी बेदम मारहाण केली. या घटनेत फिर्यादीचा (Prosecutor) डोळा फुटल्यानं त्याला शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार (Treatment) सुरू आहेत. या घटनेनं परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, बाभूळगाव पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बाभूळगाव तालुक्यातील यावली येथे काही कुटुंबाना मुल बाळ होत नाही. त्यामुळे गावातीलच प्रमोद वाकोडे आणि त्याच्या पत्नीनं जादुटोणा केला, असा संशय धरूनच गावातीलच प्रज्वल ठाकरे आणि इतर आठ लोकांनी प्रमोदच्या घरी जाऊन त्याला आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली. या घटनेत प्रमोदच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणी जखमी प्रमोद वाकोडे यांनी बाभूळगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात जादू टोणा केल्याच्या संशयावरून मारहाण केल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. त्यावरून बाभूळगाव पोलिसांनी आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मला धोका दिला, म्हणून मी तिचं मुंडकं छाटलं; प्रियकराचा कबुली जबाब, पोलीसही हादरले!

source https://marathi.abplive.com/crime/yavatmal-crime-couple-brutally-beaten-on-suspicion-of-witchcraft-injured-are-being-treated-in-nagpur-maharashtra-crime-news-1291389
0 Comments