Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7 AM: 25 June 2024

संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगालसह १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील २७८ खासदारांचा शपथविधी सोहळा
इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी १० वाजता बैठक, लोकसभा अध्यक्षपदाची ठरणार रणनीती
देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दिल्लीत, भाजप पक्षश्रेष्ठींशी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा
अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास
राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अहवाल बनवा, राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश, परदेश दौऱ्यावरून परतल्यावर अहवालांचा आढावा घेणार
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांशी देवेंद्र फडणवीसांची फोनवर चर्चा, नोटीस पाठवणाऱ्या श्वेता शालिनी यांना समज
मुंबईत नव्या इमारतींमध्ये ५० टक्के घरं मराठी माणसाला आरक्षित ठेवा, ठाकरे गटाचे नेते अनिल परबांकडून पुन्हा मागणी
फर्ग्युसन रस्त्यावरच्या ड्रग्ज प्रकरणानंतर आणखी एक व्हिडीओ समोर, पुणे-नगर रस्त्यावरच्या मॉलमध्ये २ तरुणी ड्रग्जसेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
भारताचा ट्वेन्टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश, सुपर ८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव, सेमीफायनलमध्ये भारताची गाठ इंग्लंडशी

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-majha-gaon-majha-jilha-maharashtra-news-update-7-am-25-june-2024-abp-majha-1293137
0 Comments