Sunandan Lele T20 World Cup : भारतीय आक्रमणासमोर इंग्लंडचं सपशेल लोटांगण

<p>Sunandan Lele T20 World Cup : भारतीय आक्रमणासमोर इंग्लंडचं सपशेल लोटांगण</p> <p>&nbsp;<a href="https://marathi.abplive.com/sports/cricket/ind-vs-eng-t20-world-cup-2024-semi-final-live-score-india-need-to-defend-171-to-meet-south-africa-in-the-final-1293922">टी ट्वेण्टी वर्ल्ड कप 2024</a>&nbsp;ची (T20&nbsp; World Cup 2024) दुसरी सेमी फायनल भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात पार पडली. भारतानं रोहित शर्मा, (Rohit Sharma)&nbsp; सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर 7 विकेटवर 171 धावा केल्या.&nbsp; यानंतर अक्षर पटेल, (Axar Patel) कुलदीप यादव, (Kuldeep Yadav) जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं&nbsp; इंग्लंडला पराभूत केलं. भारतानं दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांची लढत होईल. भारतानं इंग्लंडला 103 धावांवर बाद करत 68 धावांनी विजय मिळवला. अखेर भारतानं 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा बदला घेतला.</p> <p>भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी सेमी फायनल गयाना येथे पार पडली. पावसामुळे ही मॅच देखील उशिराने सुरु झाली. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार खेळीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली. भारतानं 20ओव्हरमध्ये 7 विकेटवर 171 धावा केल्या.&nbsp;रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आक्रमक फलंदाजी केली होती. आज मात्र, गयानातील परिस्थितीशी जुळवून घेत रोहित शर्माने संयमी फलंदाजी केली.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sunanadan-lele-t20-world-cup-india-vs-london-cricket-match-marathi-news-1293938

Post a Comment

0 Comments