ABP Majha Headlines 630AM एबीपी माझा हेडलाईन्स 0630 AM 11 July 2024 Marathi News

ABP Majha Headlines 630AM एबीपी माझा हेडलाईन्स 0630 AM 11 July 2024 Marathi News

विधान परिषद निवडणुकीची रणनीती फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठरणार... भाजप, राष्ट्रवादी, शिंदे आणि ठाकरेंच्या आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम..

मराठा आंदोलन उधळण्याचा सरकारचा डाव, आमच्यातल्या काही अतृप्त आत्म्यांना सरकारची फूस, झीरो अवर कार्यक्रमात मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

कावेरी नाखवा अडकल्याची जाणीव असूनही मिहीरनं बेदरकारपणे गाडी चालवली, पोलिसांचा कोर्टात दावा...ओळख लपवण्यासाठी मिहीरनं दाढी आणि केस कापल्याची माहिती...

मुंबईत ४० बाय ४० फुटापेक्षा मोठे होर्डिंग लावता येणार नाही, सुप्रीम कोर्टानं टोचले रेल्वे प्रशासनाचे कान, महापालिकेचं रेल्वेला ऐकावंच लागणार, कोर्टाची तंबी

नागपूरच्या 'निरी'त सीबीआयची मोठी कारवाई...तत्कालीन संचालकांसह चार शास्त्रज्ञ आणि पाच खासगी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल...साहित्य खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप..

मुख्यमंत्र्यांकडून मुंबईतील कोस्टल रोडची पाहणी, सी-लिंक आणि कोस्टल रोडला जोडण्याचं काम दोन ते तीन आठवड्यात पूर्ण करणार असल्याची माहिती

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-headline-0630-am-11-july-2024-marathi-news-1297206

Post a Comment

0 Comments