<p><strong>Maharashtra Vidhan Parishad Election Result Live Updates :</strong> आज होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. एकूण 11 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यासाठी 12 उमेदवार मैदानात आहेत. महाविकास आघाडीने एक अतिरिक्त उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरतेय. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने आमचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा केला जातोय. त्यामुळे आता नेमका कोणाचा उमेदवार पराभूत होणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीसाठी आजच मतदान होणार असून निकालही आजच लागणार आहे. </p>
source https://marathi.abplive.com/news/politics/maharashtra-vidhan-parishad-election-2024-mlc-election-result-voting-live-updates-today-nivadnuk-nikal-marathi-news-bjp-shiv-sena-congress-ncp-marathi-news-milind-narvekar-pankaja-munde-1297432
0 Comments