Jay pawar And Yugendra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव युवा नेते जय पवार (Jay Pawar) आणि पुतणे युगेंद्र पवार (yugendra pawar) हे दोघे कुस्तीच्या मैदानात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. बारामती तालुक्यातील कन्हेरी (Kanheri) येथील यात्रेनिमित्त कुस्त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त ते एकत्र आले. यानंतर मैदान जरी कुस्तीचं असलं तरी चर्चा मात्र, राजकारणाची सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. 
कन्हेरी यात्रेनिमित्त<a href="https://ift.tt/8uVMPc6> जय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्यांचं मैदान भरवण्यात आलं होतं. याप्रसंगी जय पवार यांच्याकडून मैदानासाठी मानाची गदा देण्यात आली. जय पवार यांना खांद्यावर घेत येथील आयोजकांकडून मैदानाला फेरी मारण्यात आली. दरम्यान, या मैदानानिमित्त जय पवार आणि युगेंद्र पवार हे समोरासमोर आले. त्यावेळी दोघांनी एकमेकांची गळाभेटही घेतली.
महत्वाच्या बातम्या:
<a href="https://ift.tt/i7d4DsH Patil : अजितदादा म्हणाले जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्डामध्ये विचार होणार, जयंत पाटील म्हणाले, अजित पवार म्हणजेच पार्लमेंटरी बोर्ड
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/jay-pawar-and-yugendra-pawar-together-in-baramati-organized-wrestling-at-kanheri-1309807
0 Comments