Top 100 News : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 01 Sep 2024 : ABP Majha

Top 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट : 01 Sep 2024 : ABP Majha
महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम, गेटवे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येणार, आंदोलनात उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले सहभागी होणार.
मुंबईत सरकारविरोधात महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलन करणार, आजच्या  आंदोलनाचा मविआचा टीझर रिलीज .
महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी महायुतीकडून आज राज्यभर आंदोलनं, पुतळा दुर्घटनेप्रकरणी माफी मागुनसुद्धा महाविकास आघाडी आंदोलन करत असल्याचा महायुतीचा आरोप.
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून राजकारण, महाराष्ट्राला असं राजकारण आवडत नाही, भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया.
सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरण, चेतन पाटीलला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी,
मराठा नेते मनोज जरांगे आज राजकोट किल्ल्याला भेट देणार, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार
आरपीआय नेते रामदास आठवले आज मालवणला जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थानाला भेट देणार
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक,  बैठकीतील चर्चेतूून तिन्ही नेते समाधानी,   जागावाटपासोबतच इतरही विषयांवर चर्चा पार

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-top-100-news-superfast-fast-news-01-sep-2024-mva-protest-maharashtra-news-abp-majha-1309813

Post a Comment

0 Comments