सकाळी 6 वाजताच्या 100 headlines 26 September 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVE

मुंबई आणि ठाण्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचं आवाहन.

पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट, पुढील २४ तासांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज.

छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज, आॅरेंज अलर्ट जारी, विदर्भातही विजांसह मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज.

मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे आणि पालघरमधील शाळांनाही आज सुट्टी, हवामान विभागाच्या अंदाजानंतर पालिकेकडून खबरदारी.

पावसामुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे आदेश, आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज.

मुंबईतील सिप्झसमोर ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात एक महिला पडली, जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू.

छत्रपती संभाजी नगरमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ग्रंथालयात पाणी. पुस्तकाच्या रॅकच्या तळाशी पाणी. काही पुस्तकेही भिजली.

बीड जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी. बीड, परळी, गेवराई आणि अंबाजोगाई तालुक्यात दमदार पाऊस. जिल्ह्यातील बहुतांश सर्वच पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर. पावसाचा काढणीला आलेल्या पिकांना फटका.

वाशिम जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस, पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात. काढणीला आलेलं सोयाबीन पीक शेतात सडण्याची भीती.

नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश. राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांची माहिती. लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर. हजारो हेक्टरवरील सोयाबीन पिकांचं नुकसान.

खोपोलीतील झेनिथ धबधब्याच्या प्रवाहातून तरुणी गेली वाहून. तरुणीचा मृतदेह पेपको कंपनीच्या पुलाजवळ सापडला.

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-100-headlines-26-september-2024-superfast-news-maharashtra-rain-marathi-news-abp-majha-1315238
0 Comments