सकाळी 6.30 च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 0630 AM TOP Headlines 630AM 26 Sept 2024

मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, पालघरमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळाही बंद

राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा इशारा, पुणे आणि पालघरला रेड अलर्ट तर मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट जारी.

पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते सिव्हील कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रोच भूमिपूजन

परिवर्तन महाशक्तीचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मेळावा, आमदार बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टींसह अन्य नेते आणि पदाधिकारी राहणार उपस्थित

महायुतीत अजूनही ९० जागांवर तिढा असल्याची माहिती,दोन दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याची अमित शाहांची सूचना, आज महायुतीच्या नेत्यांची बैठक.

कृषी कायद्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्यांवर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतनं मागितली माफी...कृषी कायदे पुन्हा लागू करायला हवेत, असं केलं होतं वक्तव्य...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेता अमिर खान यांच्या उपस्थितीत येक नंबर सिनेमाचा ट्रेलर लाँच...राज ठाकरेंचे पोस्टर्स आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उल्लेख असल्यानं चित्रपटाबद्दल उत्सुकता...

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-abp-majha-marathi-news-headlines-0630-am-26-sept-2024-maharashtra-rain-update-marathi-news-abp-majha-1315236
0 Comments