<p><strong>मुंबई : </strong> विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात स्वतंत्रपणे जागावाटप चालू आहे. आतापर्यंत भाजपाने (BJP) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवार आहेत. तर वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षानेदेखील आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. 22 ऑक्टोबरच्या रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षानेदेखील आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तुलनेने सुरक्षित आणि कोणताही वाद नसेलेल्या मतदारंसघांचा समावेश आहे. दरम्यान आज महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-23-october-2024-wednesday-assembly-election-2024-maha-vikas-aghadi-mahayuti-seat-sharing-bjp-ncp-congress-shivsena-candidate-list-for-vidhan-sabha-nivadnuk-1321223
0 Comments