<p><strong>मुंबई :</strong> राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) धूम चालू असून राजकीय वारे जोमाने वाहू लागत आहेत. भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांनी काही जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तर आपल्या उमेदवारांची पहिली यादी 23 ऑक्टोबर रोजीच जाहीर केली आहे. दरम्यान, आजदेखील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्याचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर....</p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-24-october-2024-thursday-assembly-election-2024-maha-vikas-aghadi-mahayuti-seat-sharing-bjp-ncp-congress-shivsena-candidate-list-for-vidhan-sabha-nivadnuk-1321492
0 Comments