Weather: पावसाचा इफेक्ट ओसरला, येत्या दोन दिवसात राज्यात हवामान बदलणार, IMD चा काय इशारा? वाचा

Weather Upate Maharashtra: राज्यात थंडीचा जोर ओसरलाय. अवकाळी पावसाला पोषक स्थिती तयार झाल्यानं काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता.आजही (दि.29) मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं (IMD forecast) वर्तवली आहे. दरम्यान, आजपासून राज्यात वातावरण कोरडे होण्यास सुरुवात होणार असून काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस हजेरी लावणार असल्याचं सांगण्यात आलंय. आज राज्यात वातावरण काहीसे ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.(Rain Update)

गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाला पोषक स्थिती तयार झाली होती. ढगाळ वातावरणासह हवेत गारवा होता. राज्यात शुक्रवारी व शनिवारी काही भागात हलक्या सरींचा पाऊस झाला होता. त्यामुळे उकाड्यात भर पडली होती. तापमान वाढले होते. आता येत्या काही दिवसात हवामान पुन्हा कोरडे होणार असून किमान तापमानात घट होणार असल्याचं वर्तवण्यात आलंय.

काय दिलाय हवामान विभागानं अंदाज?

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पंजाब आणि आजुबाजूच्या परिसरात स्थिरावली आहे. अरबी समुद्रात असणारा चक्राकार वाऱ्यांचा पट्टा पुढे सरकला असून उत्तर कोकण भागात आहे.परिणामी कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढली आहे. तसेच दुसरीकडे वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत असून हिमालयीन भागात हलक्या पावसासह बर्फ पडण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे 30 डिसेंबरपासून पुन्हा थंडीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेले दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण आहे. आज कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला नसला तरी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात
आली आहे.

येत्या दोन दिवसात तापमान कसे राहणार?

येत्या दोन दिवसात राज्याच्या हवामानात मोठे बदल होणार असून पावसाचा इफेक्ट ओसरणार आहे. रविवारी काही भागात हलक्या पावसाची शक्यता असून वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी येत्या दोन दिवसात हवेतील कोरडेपणा वाढणार आहे. पुन्हा एकदा गुलाबी थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. उद्यापासून(सोमवार) राज्यात  कोरड्या वाऱ्यांचा झोत वाढणार असून तुळळक भागात हलका पाऊसही असण्याची शक्यता आहे. किमान व कमाल तापमान येत्या दोन दिवसात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. रविवारपासून मात्र संपूर्ण आठवडाभर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, सकाळी विरळ धुके पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी थंडीची तीव्रता काहीशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आज (शनिवारी) मात्र कमाल तापमान स्थिर राहणार असून, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता  आहे.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/bPfhdnH Update: छत्र्या, रेनकोट तयार ठेवा! पुणे जिल्ह्यात पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-update-rain-update-imd-forecast-light-rainfall-today-weather-change-alert-1335609

Post a Comment

0 Comments