Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने थंडीचा जोर ओसरला आहे .उत्तरेत पश्चिमी चक्रवात (Western Disturbance)सक्रिय झाला असून दक्षिणेकडील राज्यांना पाऊस जोडपणार आहे .याचं वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून येत्या 24 तासात किमान तापमानात 2 ते 4 अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला .दरम्यान राज्यात अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे . त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवणार आहे .राज्यात किमान तापमान हे वाढल्याने जानेवारी महिन्यातच उत्तर महाराष्ट्रासह खानदेशात उष्णता वाढू लागली आहे .(temperature)

हवामान विभागाचा अंदाज काय ?

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, संपूर्ण राज्यात किमान तापमानात 1 ते 3 अंशांनी वाढ होत आहे .येत्या 24 तासात हे तापमान वाढेल असं सांगण्यात आलंय .दक्षिणेकडील राज्यांना ईशान्य मान्सून सक्रिय झाल्याने पावसाचा तडाखा बसणार आहे .तर उत्तरेकडील राज्यांना पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने प्रचंड थंडी सह तुरळक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा सांगण्यात आलं .दक्षिण व उत्तरेकडील तापमानात होणाऱ्या चढउतारांमुळे राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर ओसरणार आहे .(IMD Forecast)

मंगळवारी राज्यात कसे होते तापमान ?

पुण्यात 12 ते 16 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमानाचा पारा गेला होता .सातारा सोलापूर 20° पर्यंत जाऊन स्थिरावले .नाशिकच्या कळवण मध्ये 15 तर विल्होली मध्ये 20 अंशांची नोंद झाली .मुंबईत कुलाब्यात 21.5°c तापमान मंगळवारी होते .तर सांताक्रुजला 19.9 अंश सेल्सिअस तापमानाचे नोंद झाली .

मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कसे?

प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ व हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता आहे .पुढील दोन दिवसात कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस ने वाढ होऊन किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे . मंगळवारी बीडमध्ये 17.3 अंश सेल्सिअस हिंगोलीत 15.5 औरंगाबाद 17.3 अंश तापमान याची नोंद झाली .मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी 15 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेले होते .

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/KZYurRw Fadnavis: पुण्यात 31 मार्चला भारत-इंग्लंड मॅच, पिण्याच्या पाण्याकडे विशेष लक्ष द्या; GBS आजारावरुन मुख्यमंत्र्यांच्या सूचना

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-update-imd-forecast-temperature-fluctuation-in-24-hours-in-maharashtra-1341261
0 Comments