Maharashtra Weather Alert: पश्चिम हिमालयीन भागात दोन वेगवेगळ्या प्रकारचे पश्चिमी चक्रावात तयार झाले असून येत्या चार दिवसात उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.(Rain) दक्षिणेकडेही नैऋत्य मोसमी पावसाचा जोर कायम असून दक्षिणेकडील राज्यांना जोरदार पाऊस झोडपणार आहे. याचाच परिणाम महाराष्ट्रावर होणार असून तापमानात येत्या पाच दिवसात चढउतार दिसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) ने वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 तासांत राज्यातील किमान तापमान 2-4 अंश सेल्सियसने वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर कमाल तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यातील नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. (IMD forecast)

राज्यात सध्या तापमानाचा पारा किती?

गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमान वाढलेले आहे .राज्यात बहुतांश ठिकाणी 15 ते 20 अंश सेल्सिअस पर्यंत किमान तापमान नोंदवले जात आहे .तर कमाल तापमानही दोन ते तीन अंशांनी वाढले असून मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यात 35 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमानाची नोंद होत आहे . राज्यात पहाटे गारठा, धुक्याची चादर कायम असली तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. कडाक्याची थंडी गायब असतानाच कमाल तापमान 33 अंशांच्या पुढे गेले आहे. दक्षिण भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम संपत आला आहे. तर पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ईशान्य अरबी समुद्र पासून दक्षिण राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या सर्व परिस्थितीचा हवामानावर परिणाम होत आहे.

गारठा ओसरला, तापमान वाढलं

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका जाणवत होता .आता दक्षिण व उत्तरेकडील राज्यांमधील हवामानाच्या प्रभावाने राज्यातील हवामानात बदल होत आहेत .राज्यात बहुतांश ठिकाणी पहाटे किमान तापमान घटलेले असलं तरी गारठा कमी झालाय .उन्हाचा चटका कायम असून कमाल तापमानातही काही अंशी वाढ झाल्याचे नोंदवले गेले .

मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तापमान किती ?

अहमदनगर 12.9, औरंगाबाद 16.1,बीड 17,हिंगोली 11.8, जालना 17.5, लातूर 19.8, नंदुरबार 20.1,पालघर 21.3, पुणे 13 ते 17.9, रत्नागिरी 19.2,सोलापूर 18.8 मुंबई कोलाबा,सांताक्रुज 21.8

मराठवाड्यात कमाल तापमान हिंगोली व जालना जिल्ह्यांत 33 अंश सेल्सिअस राहील; तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत 34 अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव, बीड व परभणी जिल्ह्यांत 12 अंश सेल्सिअस राहील; लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत 13 अंश सेल्सिअस राहील; जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत 144 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/uSfhGMA Barre Syndrome: पनीर, चीज आणि भात खाल्ल्याने खरंच गुलेन-बॅरी सिंड्रोम होऊ शकतो? आरोग्य तज्ज्ञ काय म्हणतात?

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-alert-heavy-rain-to-lash-north-and-south-indian-states-what-s-the-situation-in-maharashtra-imd-reveals-1341098
0 Comments