Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात किमान व कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेच्या झळांना सामोरं जावं लागतंय. फेब्रुवारीतच तापमानाचा पारा 36 अंशांच्या पुढे जात असल्याने यंदा उन्हाळा तीव्र राहणार असल्याची चाहूल लागली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, (IMD) महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार सुरू असून पुढील काही दिवसांमध्ये हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात चढउतार होणार आहे. (Temperature)

हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 24 तासांत तापमानात फार मोठे बदल होणार नसून हळूहळू 1-2 अंशांनी तापमान घटणार आहे. राज्यातील उत्तरी भागात किमान तापमानात 1-2°Cची घट पुढील 24 तासांत होण्याचा अंदाज आहे. तर पुढील 2-3 दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 2-3°C ने तापमान घटण्याची शक्यता आहे.

विदर्भात कमाल तापमान पुढील 3 दिवस 2-3°C ने वाढेल, त्यानंतर पुन्हा 2-3°C ने घटण्याचा अंदाज आहे.
विदर्भात किमान तापमान पुढील 2 दिवस 2-3°C ने वाढण्याची शक्यता, त्यानंतर 2-4°C ने घटण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक तापलेली शहरं कोणती?

राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठा फरक पाहायला मिळत आहे.दरम्यान 10 फेब्रुवारीला सर्वाधिक तापमान कुठे होतं?
शहादा (नंदुरबार) – 40.3°C
अकोला – 37.7°C
पालघर – 37.2°C
करजत (रायगड) – 37.6°C
सोलापूर – 37.1°C
इन्स शिवाजी, लोणावळा (पुणे) – 38.3°C
तळेगाव (पुणे) – 38.2°C
कराड (सातारा) – 38.5°C

मध्यम तापमान (35°C - 37°C दरम्यान)
चंद्रपूर – 36.3°C
औरंगाबाद – 35.5°C
धुळे – 35.2°C
लातूर – 35.4°C
विदर्भातील बहुतांश भाग – 34°C ते 36°C दरम्यान

पुण्याचा समावेश सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत

फेब्रुवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय. काही दिवसांपूर्वी पहाटेचा गारवा सोडल्यास यंदा शहरात थंडी जाणवली नाही. गेल्या 48 तासात पुणे शहरात तापमानात मोठे बदल झाले असून शहराचा सरासरी पारा 35 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. पुणे शहर देशातील सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत गेलं आहे. (Temperature) 1 फेब्रुवारीला पुण्यातील कोरेगाव पार्क कमाल तापमान 31.5 अंश सेल्सिअस होते. आठ फेब्रुवारीला तब्बल 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील सर्वाधिक तापमान पुणे शहरात असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातूनही दिसून येत आहे.

<a href="https://ift.tt/S5xiILT Temperature: देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुणे शहराच नाव; शहराच सरासरी तापमान 35 अंशावर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-update-imd-forecast-temperature-for-next-5-days-while-pune-recorded-38-degrees-1343658
0 Comments