<p><strong>Maharashtra Breaking News Live Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याचं आज प्रयागराज कुंभमेळ्यात पवित्र स्नान आहे. संगमातील पवित्र स्नानानंतर अक्षयवट आणि हनुमान मंदिरातही दर्शन द्रौपदी मुर्मू दर्शन घेणार आहेत. तसेच दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवायला वेळ लागणार अशी सूत्रांची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यानंतरच दिल्लीचा मुख्यमंत्री ठरणार आहे. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कापूस सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकांच्या बळकटीकरणासाठीच्या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. योजनेशी संबंधित काही कागदपत्रांच्या अवलोकनानंतर घोटाळा करण्याचे नियोजन काही अधिकाऱ्यांच्या मनात अनेक महिन्यांपासूनच तयार होते का, असा संशय व्यक्त केला जातोय. </strong><strong>महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स</strong></p>
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-breaking-news-live-updates-10-february-2025-delhi-cm-devendra-fadnavis-eknath-shinde-maharashtra-politics-walmik-karad-maharashtra-politics-all-updates-1343457
0 Comments