Maharashtra Weather Update: फेब्रुवारीत अगदी एप्रीलसारखा उन्हाचा चटका! पुण्यात 36 अंशांपर्यंत पारा, उर्वरित राज्यात काय स्थिती?

Maharashtra Weather Update: राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असून बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा वाढलाय. राज्यभर कोरडे आणि शुष्क वारे वाहत असून उन्हाच्या झळांचा चटका अधिक बसू लागलाय. गेल्या काही दिवसांपासून पहाटेचा गारठा कमी झाला असून आता केवळा हलका गारवा आहे. थंडी गायब झाली असून येत्या 4 दिवसांत राज्यात नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. (IMD Forecast)

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात  येत्या चार दिवसात 3-4 अंशांनी वाढणार असून किमान तापमानही वाढणार आहे.बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार असून उष्णता वाढणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, शनिवारी पुण्यात कमाल तापमानाचा पारा 38-41 अंशांपर्यंत गेला होता. तर किमान तापमान 15-18 अंशांच्या घरात होते. बहुतांश ठिकाणी 30-36 अंशांपर्यंत कमाल तापमान होते. सोलापुरात किमान 22 अंश, साताऱ्यात 23 अंश सेल्सियस एवढा पारा होता. (Temperature)

उन्हाचा प्रभाव अधिक राहणार

राज्यात उन्हाचा प्रभाव वाढत असून, काही ठिकाणी 40°C च्या आसपास तापमान पोहोचले आहे. काही जिल्ह्यांत थंडी सौम्य स्वरूपात जाणवत असली तरी हळूहळू उन्हाळा जोर धरत आहे. पुढील काही दिवस राज्यभर उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

कमाल व किमान तापमान कुठे कसे?

राज्यात सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील Dapodi येथे 41.0°C नोंदले गेले.फेब्रुवारी महिन्यातच एप्रील महिन्यासारखे कडाक्याचं ऊन जाणवत आहे. पालघरमध्ये 38.5°C, साताऱ्यात (कराड) 39.3°C, रायगड (अलिबाग) 37.3°C, सोलापूर 36.8°C, आणि नाशिक (शहादा) 36.7°C इतक्या तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातही तापमान वाढले असून, उन्हाचा तिव्र चटका जाणवत आहे. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया  येथे 12.8°C नोंदले गेले, नंदुरबार (शहादा) 13.9°C, नाशिक (कळवण) 14.6°C आणि भंडारा (साकोली) 14.5°C या ठिकाणी पहाटे काही प्रमाणात गारठा आहे.

हेही वाचा:

<a href="https://ift.tt/qmDNtil Today 9 February 2025: आजचा रविवार खास! कोणत्या राशीचं नशीब चमकणार? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या..

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-weather-update-temperature-rising-like-april-in-february-pune-recorded-36-check-temperature-status-1343269

Post a Comment

0 Comments